ॐAarti Sangraha
My Sangraha
🛕

Vitthal ·

विठ्ठलाची आरती

विठ्ठल भक्तीची मराठी रचना.

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ।

वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।

पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा ।

चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥

॥१॥

जय देव जय देव जय पांडुरंगा ।

रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा ।

पावे जिवलगा ॥ धृ ॥

॥२॥

तुळसीमाळा गळा कर ठेवुनी कटी ।

कासे पितांबर कस्तुरी लल्लाटी ।

देव सुरवर नित्य येती भेटी ।

गरुड हनुमंत पुढे उभे राहती ॥ जय देव ॥

॥३॥

धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा ।

सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।

राई रखुमाबाई राणीया सकळा ।

ओवाळू आरत्या विठोबा सावळा ॥ जय देव ॥

॥४॥

ओवाळू आरत्या कुरवंड्या येती ।

चंद्रभागेमध्ये सोडुनिया देती ।

दिंड्या पताका वैष्णव नाचती ।

पंढरीचा महिमा वर्णावा किती ॥ जय देव ॥

॥५॥

आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।

चंद्रभागेमध्ये स्नान जे करती ।

दर्शन हेळामात्रे तया होय मुक्ती ।

केशवासी नामदेव भावे ओवाळिती ॥ जय देव ॥

॥६॥