ॐAarti Sangraha
My Sangraha
🐘

Ganpati Bappa · Ganesh Chaturthi

सुखकर्ता दुःखहर्ता

परंपरागत गणपती आरती

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।

नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।

सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।

कंठी झळके माळ मुक्ताफळांची

॥१॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।

दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ धृ ॥

॥२॥

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।

चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।

हिरेजडित मुकुट शोभतो बरा ।

रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया ॥ जय देव जय देव

॥२॥

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।

सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।

दास रामाचा वाट पाहे सदना ।

संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ॥ जय देव जय देव

॥३॥