ॐAarti Sangraha
My Sangraha
🕉️

Sai Baba ·

शिरडी माझें पंढरपूर - अभंग

शिरडी माझें पंढरपूर । साईबाबा रमावर । बाबा रमावर

॥१॥

शुद्ध भक्ती चंद्रभागा । भाव पुंडलिक जागा ||२||

॥२॥

या हो या हो अवघे जन । करा बाबांसी वंदन

॥३॥

गणू म्हणे बाबा साई। धांव पाव माझे आई

॥४॥