ॐAarti Sangraha
My Sangraha
🔱

Lord Shiva · Mahashivratri

शंकराची आरती

महादेवाची मराठी आरती.

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।

विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा ।

लावण्यसुंदर मस्तकी वाळा ।

तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा ॥

॥१॥

जय देव जय देव जय श्री शंकरा ।

आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ॥ धृ ॥

॥२॥

कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा ।

अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ।

विभूतीचे उधळण शीतकंठ नीळा ।

ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव ॥

॥३॥

देवी दैत्य सागर मंथन पै केले ।

त्यामाजी अवचित हलाहल जे उठले ।

ते त्वा असुरपणे प्राशन केले ।

नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले ॥ जय देव ॥

॥४॥

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।

पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी ।

शतकोटीचे बीज वाचे उच्चारी ।

रघुकुळटिळक रामदासा अंतरी ॥ जय देव ॥

॥५॥