अनंता तुला तें कसें रे स्तवावें।
अनंता तुला तें कसें रे नमावें।।
॥१॥अनंत मुखांचा शिणे शेष गातां।
नमस्कार साष्टांग श्रीसाइनाथा
॥१॥स्मरावें मनीं त्वत्पदा नित्य भावें।
उरावें तरी भक्तिसाठी स्वभावें॥
तरावें जगा तारूनी मायताता। नमस्कार०
॥२॥वसे जो सदा दावया संतलीला।
दिसे अज्ञ लोकापरी जो जनाला॥
परी अंतरी ज्ञान कैवल्यदाता । नमस्कार०
॥३॥बरा लाधला जन्म हा मानवाचा।
नरा सार्थका साधनीभूत साचा।।
धरूं साइप्रेमा गळाया अहंता । नमस्कार
॥४॥धरावें करींसान अल्पज्ञ बाला।
करावें आम्हां धन्य चुंबोनि गाला।।
मुखीं घाल प्रेमें खरा ग्रास आतां। नमस्कार
॥५॥सुरादिक ज्यांच्या पदा वंदिताती।
शुकादिक ज़्यातें समानत्व देती।।
प्रयागादि तीर्थेपदीं नम्र होतां ।नमस्कार०
॥६॥तुझ्या ज्या पदा पाहता गोपबाली।
सदा रंगली चित्स्वरूपी मिळाली।
करी रासक्रिडासवें । कृष्णनाथा । नमस्कार
॥७॥तुला मागतों मागणे एक द्यावें।
करा जोडितों दीन अत्यंत भावें॥
भवी मोहनीराज हा तारिं आतां। नमस्कार 11८||
॥९॥