ॐAarti Sangraha
My Sangraha
🛕

Vitthal ·

ओवाळू आरती (विठ्ठलाची आरती)

ओवाळू आरती या विठ्ठलाच्या आरतीबद्दल थोडक्यात माहिती.

मूळ आणि इतिहास: "तुका म्हणे" या नाममुद्रेमुळे ही आरती संत तुकारामांच्या नावावर रूढ आहे.

स्वरूप आणि वैशिष्ट्ये: "ओवाळू आरती माझ्या पंढरीराया" ही रचना प्रत्येक ओळ एका लहान पदाने पुन्हा गाण्याच्या पद्धतीची आहे; पाच कडव्यांत गवळ्याघरी झालेला कृष्ण गोपाळ, विटेवर उभा पांडुरंग, चरणी मिरवणारा ब्रीदाचा तोडर आणि कीर्ती वर्णताना वाचा परतणे असे वर्णन आहे.

महत्त्व: वारकरी संप्रदायात विठ्ठलपूजेतील आरत्यांपैकी एक म्हणून ही आरती म्हटली जाते.

फायदे: श्रद्धेने पठण केल्याने भावभक्तीने देव कृपाळू होतो अशी श्रद्धा आहे.

कधी म्हणावी: एकादशीला, वारीच्या काळात व विठ्ठलपूजेच्या वेळी.

ओवाळू आरती माझ्या पंढरीराया ।

माझ्या पंढरीमाया ॥

सर्वभावे शरण आलो तूझिया पाया ॥ ध्रु० ॥

॥१॥

सर्व व्यापुनि कैसे रूप राहिले अकळ ।

रूप राहिले अकळ ॥

तो हा गवळ्याघरी झाला कृष्ण गोपाळ ॥ ओवाळू०

॥१॥

निजस्वरूप गुणातीत अवतार ।

धरी अवतार धरी ॥

तो हा पांडुरंग उभा विटेवरी ॥ ओवाळू०

॥२॥

भक्तांच्या काजा कैसा रूपासी आला ।

कैसा रूपासी आला ॥

ब्रीदाचा तोडरू चरणी मिरविला ॥ ओवाळू०

॥३॥

आरति आरति कैसा ओवाळीली ।

कैसी ओवाळीली ॥

वाखाणिता कीर्ति वाचा परतली ॥ ओवाळू०

॥४॥

भावभक्तीबळे होसी कृपाळू देवा ।

होसी कृपाळू देवा ॥

तुका म्हणे तुझ्या न कळता मावा ॥ ओवाळू०

॥५॥