ॐAarti Sangraha
My Sangraha
🪔

Lakshmi · Diwali

करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता (महालक्ष्मीची आरती)

करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता या कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या आरतीबद्दल थोडक्यात माहिती.

मूळ आणि इतिहास: "मुक्तेश्वर" या नाममुद्रेने संपणारी ही आरती करवीर (कोल्हापूर) येथील महालक्ष्मीच्या स्तुतीसाठी आहे.

स्वरूप आणि वैशिष्ट्ये: करवीरपुरवासिनी, सुरवरमुनींची माता आणि मुरहराची (विष्णूची) प्रियकांता अशा विशेषणांनी देवीला संबोधून तिच्या हातातील मातुलिंग-गदा-खेटक-पानपात्र, माणिकदशना व सुरंगवसना रूप, तसेच तारा-गौरी-गायत्री-पद्मावती या रूपांचा उल्लेख पाच कडव्यांत येतो; "जय देवी जय देवी जय महालक्ष्मी" हे ध्रुवपद आहे.

महत्त्व: कोल्हापूरच्या महालक्ष्मी-अंबाबाईच्या उपासनेत ही आरती म्हटली जाते.

फायदे: श्रद्धेने पठण केल्याने कर्मबंधनातून सुटका होऊन मातेची कृपा लाभते अशी श्रद्धा आहे.

कधी म्हणावी: शुक्रवारी, नवरात्रात व दिवाळीतील लक्ष्मीपूजनात.

करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता ।

पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकांता ॥

कमलाकारे जठरी जन्मविला धाता ।

सहस्त्रवदनी भूधर न पुरे गुण गाता

॥१॥

जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।

वससी व्यापकरूपे तू स्थूलसूक्ष्मी ॥ ध्रु० ॥

॥२॥

मातुलिग गदायुत खेटक रविकिरणी ।

झळके हाटकवाटी पीयुषरसपाणी ॥

माणिकदशना सुरंगवसना मृगनयनी ।

शशिधरवदना, राजस मदनाची जननी ॥ जय०

॥२॥

तारा शक्ति अगम्या शिवभजका गौरी ।

साख्य म्हणती प्रकृति निर्गुण निर्धारी ॥

गायत्री निजबीजा निगमागम सारी ।

प्रगटे पद्मावती निजधर्माचारी ॥ जय०

॥३॥

अमृतभरिते सरिते अघदुरिते वारी ।

मारी दुर्घट असुरा भव दुस्तर तारी ॥

वारी मायापटल प्रणमत परिवरी ।

हे रूप चिद्रुप तद्रुप दावी निर्धारी ॥ जय०

॥४॥

चतुरानने कुत्सित कर्माच्या ओळी ।

लिहिल्या असतिल माते माझे निजभाळी ॥

पुसोनि भरणातळी पदसुमने क्षाळी ।

मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी ॥ जय०

॥५॥