ॐAarti Sangraha
My Sangraha
🔱

Lord Shiva · Mahashivratri

जय जय शिव (शंकराची आरती)

जय जय शिव या शंकराच्या आरतीबद्दल थोडक्यात माहिती.

मूळ आणि इतिहास: शंकराची ही आरती संस्कृतप्रचुर शब्दरचनेत असून रचनाकाराचे नाव मजकुरात दिलेले नाही.

स्वरूप आणि वैशिष्ट्ये: गिरिजारमण, पंचवदन, त्र्यंबक, त्रिपुरासुरदहन, वृषभध्वज, गंगाधर आणि गणपतीजनक अशा उपाधींनी शिवाला वंदन करणारी ही आरती तीन कडव्यांत आहे; "जय देव जय देव जय शंकर सांबा" हे ध्रुवपद आहे.

महत्त्व: शिवोपासनेत शंकराच्या विविध नामांचे स्मरण घडवणारी ही आरती शिवपूजेत म्हटली जाते.

फायदे: श्रद्धेने पठण केल्याने भवभ्रांती दूर होते अशी श्रद्धा आहे.

कधी म्हणावी: सोमवारी, महाशिवरात्रीला व शिवपूजेच्या वेळी.

जय जय शिव हर शंकर जय गिरिजारमणा ॥

पंचवदन जय त्र्यंबक त्रिपुरासुरदहना ॥

भवभयभंजन सुंदर स्मरहर सुखसदना ॥

अविकल ब्रह्म निरामय जय जगदुद्धरणा

॥१॥

जय देव जय देव जय शंकर सांबा ॥

ओंवाळित निजभावें, नमितों मी सद्भावें वर सहजगदंबा ॥ ध्रु० ॥

॥२॥

जगदंकुरवरबीजा सन्मय सुखनीजा ॥

सर्व चराचर व्यापक जगजीवनराजा ॥

प्रार्थित करुणावचनें जय वृषभध्वजा ॥

हर हर सर्वहि माया नमितों पदकंजा ॥ जय देव०

॥२॥

गंगाधर गौरीवर जय गणपतिजनका ॥

भक्तजनप्रिय शंभो वंद्य तूं मुनिसनकां ॥

करुणाकर सुख्सागर जगनगिंच्या कनका ॥

तव पद वंदित मौनी भवभ्रांतीहरका ॥

जय देव जय देव जय शंकरा सांबा ॥

ओंवाळित निजभावें, नमितों मी सद्भावें वर सहजगदंबा

॥३॥