जय देव जय देव जय श्रीशशिनाथा ।
आरती ओवाळू पदि ठेउनि माथा ॥ ध्रु० ॥
॥१॥उदयी तुझ्या हृदयी शीतलता उपजे ।
हेलावुनि क्षीराब्धी आनंदे गर्जे ॥
विकसित कुमुदिनि देखुनि मन ते बहु रंजे ।
चकोर नृत्य करिती सुख अद्भुत माजे ॥ जय०
॥१॥विशेष महिमा तुझा न कळे कोणासी ।
त्रिभुवनि द्वादशराशी व्यापुनि आहेसी ॥
नवही ग्रहांमध्ये उत्तम तूम होसी ।
तुझे बल वांछिती सकळहि कार्यासी ॥ जय०
॥२॥शंकरगणनाथादिक भूषण मिरवीती ।
भाळी मौळी तुजला संतोषे धरिती ॥
संकटनामचतुर्थीस पूजन जे करिती ।
संतति संपद पावुनि भवसागर तरती ॥ जय०
॥३॥केवळ अमृतरूप अनुपम्य वळसी ।
स्थावर जंगम यांचे जीवन आहेसी ॥
प्रकाश अवलोकिता मन हे उल्हासी ।
प्रसन्न होउनि आता लावी निजकासी ॥ जय०
॥४॥सिंधूतनया इंदू बंधु श्रीयेचा ।
सुकीर्तिदायक नायक उडुगण जो यांचा ॥
कुरंगवाहनचंद्रा अनुचित हे वाचा ।
गोसावीसुत विनवी वर दे मज साचा ॥ जय०
॥५॥