दुर्गे दुर्घटभारी तुजवीण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणाविस्तारी ।
वारी वारी जन्ममरणांते वारी ।
हारी पडलो आता संकट निवारी
॥१॥जय देवी जय देवी महिषासुरमथिनी ।
सुरवर ईश्वर वरदे तारकसंजीवनी ॥ धृ ॥
॥२॥तुजवीण भुवनी पाहता तुज ऐसे नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलवे काही ।
साही विवाद करिता पडले प्रवाही ।
ते तू भक्तालागी पावसि लवलाही
॥२॥प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा ।
क्लेशांपासुनी सोडवी तोडी भवपाशा ।
अंबे तुजवाचून कोण पुरवील आशा ।
नरहरी तल्लीन झाला पदपंकजलेशा
॥३॥