ॐAarti Sangraha
My Sangraha
🙏

Sadguru ·

देहत्रय निरसीत (गुरूची आरती)

देहत्रय निरसीत या सद्गुरूच्या आरतीबद्दल थोडक्यात माहिती.

मूळ आणि इतिहास: सद्गुरूंच्या उपदेशाने प्राप्त झालेल्या आत्मानुभवाचे वर्णन करणारी ही आरती "गोसावीनंदन" या नाममुद्रेने संपते.

स्वरूप आणि वैशिष्ट्ये: देहत्रयाचे निरसन, पाच तत्त्वांशी समरसता, ज्ञानादि त्रिपुटी मावळणे आणि भेदाभेद मायिक असल्याचा अनुभव अशा वेदांतविचारांचा आशय तीन कडव्यांत आहे; "जय देव जय देव सद्ग्रुरुनाथा" हे ध्रुवपद आहे.

महत्त्व: गुरुभक्तीबरोबरच अद्वैत वेदांताचा गूढार्थ सोप्या शब्दांत सांगणारी ही आरती गुरुपूजेत म्हटली जाते.

फायदे: श्रद्धेने पठण केल्याने सद्गुरूंच्या कृपेने भवव्यथा हरते अशी श्रद्धा आहे.

कधी म्हणावी: गुरुपौर्णिमेला, गुरुवारी व सद्गुरूंच्या पूजेच्या वेळी.

देहत्रय निरसीत चिन्मय जे उरले ॥

ते मी ऐसे तुझिया वचने जाणवले ॥

पाचांच्या अन्वये अवघे समरसले ॥

ज्ञानादि त्रिपुटीचे भानहि मावळले

॥१॥

जय देव जय देव सद्ग्रुरुनाथा ॥

तव पददर्शनमात्रे हरली भवव्यथा ॥ ध्रु० ॥

॥२॥

आहे नाही पण याविरहित मी साचा ॥

माझ्या ठायी व्यापक स्थितिलय विश्वाचा ॥

तेथे भेदाभेद मायिक तो कैचा ॥

घडला अनुभव ऐसा प्रकार स्वामीचा ॥ जय०

॥२॥

जे काही बोलणे जललहरिप्राय ॥

त्याहुनि वर भिन्नत्वे काय ॥

आता मौन्ये तूझे वंदावे पाय ॥

गोसावीनंदन सहजचि चिन्मय ॥ जय०

॥३॥