ॐAarti Sangraha
My Sangraha
🏹

Rama ·

अयोध्या पुरपट्टण (रामचंद्राची आरती)

अयोध्या पुरपट्टण या रामचंद्राच्या आरतीबद्दल थोडक्यात माहिती.

मूळ आणि इतिहास: "कृष्णदास" या नाममुद्रेने संपणारी ही रामचंद्राची आरती श्रीरामजन्माच्या आनंदोत्सवाचे वर्णन करते.

स्वरूप आणि वैशिष्ट्ये: शरयूतीरी अयोध्येत कौसल्येच्या उदरी श्रीरामाचा अवतार, आनंदित नर-नारी, आकाशातून सुरवरांची पुष्पवृष्टी, अप्सरा-गंधर्वांचे गायन आणि रामाच्या कुंडले-मुकुट-कस्तुरीतिलकाचे रूपवर्णन चार कडव्यांत आहे; "जय देव जय देव जय श्रीरामा" हे ध्रुवपद आहे.

महत्त्व: रामनवमीच्या जन्मोत्सवात रामजन्माचे वर्णन करणारी ही आरती आवर्जून म्हटली जाते.

फायदे: श्रद्धेने पठण केल्याने श्रीरामांची कृपा लाभून मनाला आनंद व शांती मिळते अशी श्रद्धा आहे.

कधी म्हणावी: रामनवमीला व रामपूजेच्या वेळी.

अयोध्या पुरपट्टण शरयूचे तीरी ।

अवतरले श्रीराम कौसल्येउदरी ॥

स्वानंदे निर्भर होती नरनारी ।

आरति घेउनि येती दशरथमंदीरी

॥१॥

जय देव जय देव जय श्रीरामा ।

आरती ओवाळू तुज पूर्णकामा ॥ ध्रु० ॥

॥२॥

पुष्पवृष्टी सुरवर गगनीहुनि करिती ।

दानव दुष्ट भयभीत झाले या क्षीती ॥

अप्सरा गंधर्व गायने करिती ।

त्रिभुवनी आल्हादे मंगले गाती ॥ जय०

॥२॥

कर्णी कुंडल माथा मुकुट सुविराजे ।

नासिक सरळ भाळी कस्तुरी साजे ॥

विशाळ सुकपोली नेत्रद्वय जलजे ।

षट्पदरुणझुणशब्दे नभ मंडळ गाजे ॥ जय०

॥३॥

रामचंद्रा पाहता वेधलि पै वृत्ती ।

नयनोन्मीलन ढाळू विसरली पाती ॥

सुरवर किन्नर जयजयकारे गर्जती ।

कृष्णदासा अंतरी श्रीराममूर्ती ॥ जय०

॥४॥