ॐAarti Sangraha
My Sangraha
🙏

Sadguru ·

आरती सिद्धराया (सिद्धारूढस्वामींची आरती)

आरती सिद्धराया या सिद्धारूढ स्वामींच्या आरतीबद्दल थोडक्यात माहिती.

मूळ आणि इतिहास: हुबळी येथील सिद्धारूढ स्वामींची ही आरती "श्रीधर दास" या नाममुद्रेने संपते.

स्वरूप आणि वैशिष्ट्ये: सिद्धारूढ नामाचे सार, द्वैत सोडून काम-क्रोध-लोभ या शत्रूंना दूर करण्याचा उपदेश आणि भक्तांची माय होणारे सिद्धरूप अशा आशयाची पाच कडवी यात आहेत; "आरती सिद्धराया, करू द्वैत सोडोनीया" हे ध्रुवपद आहे.

महत्त्व: सिद्धारूढ स्वामींच्या भक्तपरंपरेत ही आरती म्हटली जाते.

फायदे: श्रद्धेने पठण केल्याने द्वैतभाव व आशा-ममता-तृष्णा यांतून मुक्ती मिळण्यास मदत होते अशी श्रद्धा आहे.

कधी म्हणावी: गुरुवारी व सद्गुरूंच्या पूजेच्या वेळी.

आरती सिद्धराया ।

करू द्वैत सोडोनीया ॥

आशा ममता तृष्णा-बीज ।

टाका तुम्ही जाळोनीया ॥ ध्रु० ॥

॥१॥

चित्सुख परात्पर ।

नाम सिद्धारुढ सार ॥

देव भक्त तूचि होसी ।

क्रीडा करिसी अपार ॥ आरती ०

॥१॥

काम, क्रोध, लोभ ।

देही नांदती स्वयंभ ॥

हेची शत्रू दूर होता ।

आम्हा होसी तू सुलभ ॥ आरती०

॥२॥

भक्ति प्रेम तूज प्रीय ।

म्हणुनि सगुणरूपी सोय ॥

हुबळीत सिद्ध रूपे ।

होसी भक्तांची तू माय ॥ आरती०

॥३॥

नामाचा तू अभिमानी ।

आले पूर्ण ते कळोनी ॥

कधी नाही उपेक्षिले ।

जे का लागले भजनी ॥ आरती०

॥४॥

श्रीधर दास तुझे पोर ।

करू नको कधी दूर ॥

अखंडित तुझ्या पायी ।

ठेवा करूनि स्थिर ॥ आरती०

॥५॥