ॐAarti Sangraha
My Sangraha
🐚

Vishnu ·

आरती करू गोपाळा (विष्णूची आरती)

आरती करू गोपाळा या विष्णूच्या आरतीबद्दल थोडक्यात माहिती.

मूळ आणि इतिहास: "रमावल्लभदास" या नाममुद्रेने संपणारी ही आरती रमावल्लभदासांच्या नावावर रूढ आहे.

स्वरूप आणि वैशिष्ट्ये: पूजेच्या प्रत्येक उपचाराला अध्यात्मिक अर्थ देणारी रचना: गंगाजळाने स्नान, भक्तीचे भूषण, अहंकाराचा धूप, समाधी लावणारा दीप, अहंचा नैवेद्य आणि पंचप्राणांच्या पाच ज्योतींची आरती; आरतीच्या प्रकाशात चंद्र-सूर्य लोपून देव-भक्त भेद न उरणे हा पाच कडव्यांचा आशय आहे.

महत्त्व: पूजेचे बाह्य उपचार अंतरंगातील भावाशी जोडणारी ही आरती गोपाळरूप विष्णूच्या पूजेत म्हटली जाते.

फायदे: श्रद्धेने पठण केल्याने अहंभाव गळून मनाची एकाग्रता वाढते अशी श्रद्धा आहे.

कधी म्हणावी: एकादशीला, गुरुवारी व विष्णूपूजेच्या वेळी.

आरती आरती करू गोपाळा ।

मी तू पण सांडोनी वेळोवेळा ॥ ध्रु० ॥

॥१॥

आवडी गंगाजळे देवा न्हाणिले ।

भक्तीचे भूषण प्रेमसुगंध अर्पिले ॥

अह हा धूप जाळू श्रीहरीपुढे ।

जव जव धूप जळे तव तव देवा आवडे ॥ आरती०

॥१॥

रमावल्लभदासे अहंधूप जाळिला ।

एका आरतीचा मा प्रारंभ केला ॥

सोह हा दीप ओवाळू गोविंदा ।

समाधी लागली पाहता मुखारविंदा ॥ आरती०

॥२॥

हरिखें हरीख होतो मुख पाहता ।

प्रगटल्या ह्या नारी सर्वहि अवस्था ॥

सद्भावालागी बहु हा देव भूकेला ।

रमावल्लभदासे अहं नैवेद्य अर्पिला ॥ आरती०

॥३॥

फल तांबूल दक्षिणा अर्पिली ।

तया उपरी नीरांजने मांडिली ॥

पंचप्राण पंचज्योति आरति उजळली ।

विश्व हे लोपले तया प्रकाशातळी ॥ आरती०

॥४॥

आरतीप्रकाशे चंद्रसूर्य लोपले ।

सुरवर नभी तेथे तटस्थ ठेले ॥

देवभक्तपण न दिसे काही ।

ऐशापरी दास रमावल्लभा पायी ॥ आरती०

॥५॥